​सावंतवाडी : भाजपाच्या सेवा अभियानाअंतर्गत प्रलंबित कामांच्या निवेदनांचे सावंतवाडीत आयोजन

शेअर करा

सावंतवाडी,दि.२० ऑगस्ट


भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विविध प्रलंबित प्रश्न व कामांसंदर्भातील निवेदने स्वीकारली जाणार आहेत.
​ही निवेदने प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या नावाने सादर करायची आहेत. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण विभागाचे संयोजक तथा प्रदेश प्रवक्ता श्री प्रमोद जठार आणि श्री संतोष साखरे हे उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारतील.
येत्या ​सोमवार, दि.२४ ऑगस्ट सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बॅरिस्टर नाथ पै व्यासपीठ, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या प्रलंबित कामांची निवेदने घेऊन या सेवा अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा