सावंतवाडी,दि.२१ ऑगस्ट
सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, सावंतवाडीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत सर्व १३ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सावंतवाडीचे सहकार अधिकारी श्रेणी-२ आरोंदेकर यांनी काम पाहिले. संस्थेच्या संचालक मंडळात सर्वसाधारण प्रवर्ग ८, मागास प्रवर्ग १, अनुसूचित जाती/जमाती १, भटक्या विमुक्त जमाती (एनटी) प्रवर्ग १ आणि महिला प्रतिनिधी २ अशा एकूण १३ जागा होत्या.
बिनविरोध निवडून आलेले संचालक:
सर्वसाधारण प्रवर्ग: रामानंद शिरोडकर (विद्यमान अध्यक्ष), प्रमोद सावंत, महेश कन्नाई, प्रकाश भितये, विश्वनाथ राऊळ, बाबुराव उर्फ अर्जुन कवीटकर, विष्णु महादेव उर्फ मंथन गवस आणि नंदकिशोर दळवी (दोडामार्ग).
इतर मागास प्रवर्ग: आनंद मोरजकर.
महिला प्रतिनिधी: सौ. विभावरी सुकी आणि कु. मुक्ता सावंत.
सर्व संचालकांचे उपस्थित सभासदांनी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी संस्थेचे मानद सचिव धर्माजी गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडून आलेल्या सर्व संचालकांनी संस्थेच्या प्रगतीत भरीव कामगिरी करण्याचे आश्वासन दिले आहे.