सावंतवाडी : वैभववाडीचे युवा वकील, कलावंत अँड. विवेक गोखले यांचे निधनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे श्रद्धांजली

शेअर करा

सावंतवाडी,दि.२५ ऑगस्ट
वैभववाडी येथील युवा वकील अँड. विवेक गोखले (वय ३४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना तसेच नाधवडे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायालयात शोकसभा (‘रेफरन्स’) आयोजित करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
​या शोकसभेला प्रधान जिल्हा न्यायाधीश डॉ. देशपांडे यांच्यासह सर्व सहकारी न्यायाधीश वर्ग, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक, कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, बीसीएमजी (BCMG) सदस्य अँड. संग्राम देसाई, जिल्हा सरकारी वकील अँड. संदीप राणे व त्यांचे सहकारी, तसेच जिल्ह्यातील वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांनी मौन बाळगून दिवंगत अँड. गोखले यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
​मूलतः वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील रहिवासी असलेल्या अँड. विवेक गोखले यांनी आपले ‘एलएल.बी.’ (LLB) चे शिक्षण रत्नागिरी येथे पूर्ण केले होते. २०१६-१७ पासून त्यांनी कणकवली व वैभववाडी येथील दिवाणी न्यायालयात वकिली व्यवसायास सुरुवात केली होती. कमी कालावधीत त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने वकील वर्गात ओळख निर्माण केली होती.
​वकिली व्यवसायासोबतच ते एक उत्कृष्ट नाटककार, कुशल तबलापटू आणि कीर्तनकार म्हणूनही सुपरिचित होते.

शेअर करा