सावंतवाडी : तिरोडा ग्रामपंचायतीतर्फे आयोजित विविध स्पर्धां संपन्न

शेअर करा

सावंतवाडी,दि. १९ ऑगस्ट

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने विविध स्पर्धा व शैक्षणिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थी ,पालक तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


यावेळी रानभाजी प्रदर्शन, देशभक्तीपर समूहगान, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, वेशभूषा ,चित्रकला तसेच विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विजेत्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


रानभाजी प्रदर्शनाचे परीक्षण सरपंच प्रियंका सावंत व विजय टोणपे यांनी केले. देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे परीक्षण श्रीमती बर्वे यांनी केले.


कार्यक्रमाला सरपंच प्रियंका सावंत, उपसरपंच संदेश केरकर, सदस्य विश्रांती साळगावकर, वृंदावनी गावडे, दर्शना मातोंडकर, भास्कर गोटकर, पोलीस पाटील लवू रकजी, ग्रामपंचायत अधिकारी मुकुंद परब, संघाचे अध्यक्ष व सचिव, बचत गटातील महिला तसेच विद्यार्थी उपस्थित होते. प्राथमिक शाळेचे शिक्षक जनार्दन प्रभू, दिपक राऊळ, संगीता राळकर, श्रीमती शेणई आणि आरोग्य विभागाच्या सीएचओ श्रीमती शेट्ये यांचीही उपस्थिती होती.

शेअर करा