सावंतवाडी,दि.०५ जुन
ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडी या संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सालईवाडा, सावंतवाडी येथील ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र’ येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या सभेला सर्व सभासदांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे सचिव श्री. प्रकाश राऊळ यांनी केले आहे.
या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, सन २०२५-२०२६ चा वार्षिक अहवाल व जमाखर्च मंजूर करणे, तसेच सन २०२६-२०२७ च्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे यांवर चर्चा होणार आहे. याशिवाय हिशेब तपासनीसांची नेमणूक करणे, सभासदांच्या सूचना व ठरावांवर निर्णय घेणे आणि अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळच्या विषयांवर विचार करणे हे विषय कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट आहेत.
सभासदांना काही सूचना किंवा ठराव मांडायचे असल्यास त्यांनी ते बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ पर्यंत सचिव किंवा अध्यक्षांकडे लेखी स्वरूपात देणे गरजेचे आहे. सभेच्या वेळी गणसंख्या अपूर्ण असल्यास अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी सभा घेतली जाईल. तसेच सभेला येताना सर्व सभासदांनी वार्षिक अहवाल सोबत आणणे आवश्यक आहे, असे नोटीस मध्ये आवाहन केले आहे.