इयत्ता ६ वी–७ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन; शिक्षक परत शाळेत रुजू करण्याची मागणी
सावंतवाडी ,दि.०६ ऑगस्ट
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगेली सावरवाड शाळेतील शाळेत इयत्ता ६ वी, ७ वी च्या वर्गाकरिता पदवीधर शिक्षक उपलब्ध नाही. आमच्या शाळेतील पदवीधर शिक्षक श्री. सुनील परशराम करडे हे गणित आणि विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक आहेत परंतु ते सध्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्याकडे उसनवारी तत्वावर कार्यरत आहेत. त्यामुळे आमच्या शाळेत पदवीधर शिक्षक उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त वर्गाचा भार असून सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक वेळ देणे शक्य होत नाही.त्यामुळे सदर शिक्षकाला पुन्हा शाळेत हजर करून घ्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा पालकांच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी एस जी शेर्ले यांची भेट होईल दिले आहे यावेळी माजी सभापती रवींद्र मडगावकर सरपंच देवयानी पवार सविता ठाकूर अमृता काळे अनिता सावंत कविता पाटील रूपाली देऊळकर शितल कुरतरकर तनवी कुडतरकर विलास मोरजकर साईनाथ देऊलकर आदी पालक उपस्थित होते यावेळी श्री शे लेकर यांनी आपण निश्चितपणे या संदर्भात वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करू आणि तुम्हाला शिक्षक देण्याची व्यवस्था केली जाईल असे स्पष्ट केले
त्यामुळे वरच्या वर्गासाठी एक शिक्षक उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आमच्या शाळेस एक अतिरिक्त शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावा हि विनंती.
आपण या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक व तातडीने विचार करून आवश्यक ती कार्यवाही कराल, अशी आम्हा सर्व पालकांना अपेक्षा आहे.