सावंतवाडीत बोलेरोच्या धडकेत रिक्षाचालक जखमी

शेअर करा

जखमी विनायक बाळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल; जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व सेवाभावी संस्थांचे सहकार्य

सावंतवाडी,दि.२६ सप्टेंबर

विनायक रंगनाथ बाळे राहणार सावंतवाडी तालुका आजगाव भोमवाडी, वय 42 हे रुग्ण रिक्षा चालक असून हे रेल्वे स्टेशन वरती प्रवासाला सोडून रिक्षाने आजगाव भोंबवाडी येथे माघारी जात असताना बोलेरो गाडीने रिक्षाला समोरासमोर येऊन धडक देऊन अपघात झाला. यावेळी जखमी विनायक बाळे याला अधिक उपचारासाठी मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे तसेच साहिल नाईक सागर नाईक यांनी अटल प्रतिष्ठान सावंतवाडी,कै.सदाशिव सखाराम मराठे सेवा भावी ट्रस्ट व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे च्या रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.प्रकृती ठीक असल्याने प्राथमिक उपचार इंजेक्शन व औषधे देऊन सिटीस्कॅन करून ‌ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू केले आहे.तरी ही बातमी कळताच सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी लगेच यांना सहकार्य करण्यात आले या कामी पत्रकार ‌ उपसरपंच हेमंत मराठे व त्यांचे मित्र सागर नाईक तसेच साहिल नाईक यांनी मोलाचे सहकार्य केले. सावंत उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉ.सभा लाड खान तसे डॉ.दिनेश संगेवार तसेच आरोग्य कर्मचारी कृष्णा जाधव यांनी लगेचच या रुग्णाला डोक्याला टाके मारण्यासाठी सहकार्य केले आहे

शेअर करा