सावंतवाडीत बाबू कुडतरकरांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा

शेअर करा

आमदार दीपक केसरकरांकडून बाबू कुडतरकर व संदेश सोनुर्लेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सावंतवाडी,दि.२३ ऑगस्ट

शिवसेना शहरप्रमुख, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या मध्यवर्ती कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार दीपक केसरकर यांनी बाबू कुडतरकर आणि संदेश दिलीप सोनुर्लेकर यांना वाढदिवसाच्या स्नेहमय शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, स्वतः बाबू कुडतरकर,अजय गोंदावळे आणि तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी वाढदिवसाच्या गाण्यांची मैफल सजवून कार्यक्रमात विशेष रंगत आणली. तसेच ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांनी श्री. कुडतरकर यांना ओवाळून शुभेच्छा दिल्या.


​या उत्साही सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सभापती सुष्मिता जाधव,तालुकाप्रमुख नारायण राणे, तालुका प्रमुख दिनेश गावडे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर,नगरसेवक अजय गोंदावळे, गोविंद वाडकर, गजानन नाटेकर,भारती मोरे, शर्वरी धारगळकर, स्वप्ना नाटेकर यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि ‘श्री कुडतरकर मित्र मंडळ’ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कुडतरकर यांच्या भावी वाटचालीस उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

शेअर करा