सावंतवाडी,दि.२६ जून
येथील प्रथितयश इंजिनिअर नाना कशाळीकर आणि उद्योजिका मृणालिनी कशाळीकर यांची कन्या प्रा. सौ. भक्ती परांजपे यांनी नुकतीच इंजिनिअरिंगमधील सर्वोच्च पदवी म्हणजेच पी.एचडी. प्राप्त केली आहे.
त्या सध्या पुण्यातील एम.आय.टी. कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत असून, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन हा त्यांचा विषय आहे. त्यांनी ‘Automatic Image Annotation Algorithm for Driver Assistance System’ या विषयातील पी.एचडी. विशेष गुणांसह प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.