सावंतवाडी,दि.०६ जुन
येथील चराठे-वझरवाडी येथील श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोसले नॉलेज सिटी’ या नामांकित शैक्षणिक संस्थेचा १२ वा वर्धापन दिन सोहळा आज, शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या बारा वर्षांच्या यशस्वी वाटचालीमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, हितचिंतक आणि समाजातील विविध घटकांच्या सहकार्यामुळे संस्थेने शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साध्य केली आहे, अशी भावना विश्वस्त मंडळाने व्यक्त केली आहे. तसेच या यशस्वी प्रवासात लाभलेल्या सर्वांच्या बहुमोल योगदानाबद्दल संस्थेने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हा सोहळा भोसले नॉलेज सिटी, चराठे, वझरवाडी (ता. सावंतवाडी) येथील प्रांगणात संपन्न होणार असून, सायंकाळी ४ ते ७ या वेळेत तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मंगलप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.