सावंतवाडीत पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

शेअर करा

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात विसर्जन मिरवणुका

सावंतवाडी,दि.१८ सप्टेंबर

सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात आज पाच दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणेशभक्तांनी विसर्जन मिरवणुका काढल्या.
सावंतवाडी शहरातील मोती तलावात तसेच ग्रामीण भागातील नदी-नाले आणि अन्य जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी भक्तिमय वातावरणात भाविकांनी बाप्पाला निरोप देत पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना केली..

शेअर करा