सावंतवाडी: कवठणी उपसरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अजय सावंत विजयी

शेअर करा

अजय सावंत यांना ५ तर विजया कवठणकर यांना ३ मते; उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव

सावंतवाडी,दि.२१ ऑगस्ट

कवठणी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाच्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार अजय सावंत यांनी उबाठा शिवसेनेच्या विजया कवठणकर यांना पराभूत करून उपसरपंचपदी विजयी झाले. अजय सावंत यांना पाच तर विजया कवठणकर यांना तीन मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन नाईक यांनी काम पाहिले.
उपसरपंचपदाचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण करून श्रद्धा कवठणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे अजय सावंत विजयी झाले. या विजयानंतर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर यांनी उपसरपंच सावंत यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच अजय सावंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सरपंच अजित कवठणकर, माजी सरपंच दिपक कवठणकर, बाळ नाईक, श्याम नाईक, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कवठणकर, रश्मी कवठणकर, श्रद्धा कवठणकर तसेच रेखा रेडकर, राजेश गावकर, अक्षता कवठणकर, सपना कवठणकर, अक्षरा सावंत आदी उपस्थित होते.

शेअर करा