सावंतवाडी : ओटवणेतील घरफोडी; कपाटातून एक लाखांची रोकड लंपास

शेअर करा

कापईवाडीतील घटना; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया, पोलिसांकडून तपास सुरू

सावंतवाडी,दि.२३ जून

ओटवणे कापईवाडी येथे घरातील कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरीस गेली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले चोरट्याचा शोध घेतला मात्र त्याचा सुगावा लागला नाही. रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ओटवणे कापईवाडी येथे एका घरातील आतील कपाटात काही कामानिमित्य एक लाख रुपयांची रोकड आणून ठेवली होती. संध्याकाळी जाऊन पाहिले असता ती रोकड गायब झाली. याबाबत ओटवणे पोलीस पाटील यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली त्यावरून पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, सहा पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत, पो मंगेश शिंगाडे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनेची माहिती पोलिसांनी घेतली. ही रोकड कोणी चोरली याबाबत पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शेअर करा