सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न

शेअर करा

सावंतवाडी,दि.१५ जुलै
सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक शनिवारी उत्साहपूर्ण आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला.
शालेय मंत्रिमंडळातील विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रचारादरम्यान उमेदवारांनी आपल्या योजना व उद्दिष्टे विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यानंतर लोकशाही निवडणूक प्रक्रियेची वातावरण निर्मिती करून मतदान करण्यात आले . संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित पार पडली . विद्यार्थ्यांना मतदान या संकल्पनेचा अनुभव मिळावा , यासाठी प्रशालेत शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपन्न झाली .यामध्ये विद्यार्थ्यांनी मतदात्याची भूमिका बजावली .

शिक्षकांच्या देखरेखीखाली मतमोजणी करून मंगळवारी विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. विजेत्यांचे मुख्याध्यापिका सौ. निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षकआणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. निर्मला हेशागोळ यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव यांचे महत्त्व पटवून देत निवडून आलेल्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन केले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सहकार्य, जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा मिळाली.

शेअर करा