सावंतवाडी : वैश्यवाड्यात अंगारकी संकष्टीला सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

शेअर करा

२९ सप्टेंबरला सहस्र मोदकांचा नैवेद्य अर्पण सोहळा; २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विशेष आयोजन

सावंतवाडी,दि.२७ सप्टेंबर

सावंतवाडी, वैश्यवाडा, सावंतवाडी येथील २१ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरू असून या गणेशोत्सवातील संकष्टीचा योग अंगारक आल्याने मंगळवारी दि. २९ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टी दिनी सामाुदायीक अथर्वशीर्ष पठण व सहस्र मोदक नैवेद्य अर्पण सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे.
​श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या या गणेशोत्सवात अंगारकी संकष्टी दिनी सकाळी ७:०० वाजता सामाुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार असून दुपारी १:०० वाजता महाआरती व त्यानंतर श्री चरणी सहस्र मोदक अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
​या गणेशोत्सवात रोज भजनादी कार्यक्रम सुरू असून त्यात धोंडी दळवी, म्हापसेकर बंधू, महादेव गावडे, उत्सव समिती, वैभव म्हापसेकर, शरद सुकी, महावीर चेंडके, बाळगोपाळ मित्रमंडळ, राजेंद्र म्हापसेकर, प्रकाश मिशाळ, प्रकाश सुकी यांनी सहभाग घेतला असून लघुरुद्र पूजा अण्णा म्हापसेकर, पंचखाद्य प्रसाद डॉ. दादा केसरकर यांच्याकडून होणार आहे.
​विसर्जन मिरवणूक
रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायं. श्रींची भव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार असून त्यात आकर्षक देखावे तसेच विविध कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे केले जाणार आहेत.
​या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद कोदे यांनी केले आहे.

शेअर करा