सावंतवाडी: वैश्य भवन हॉल भाडेप्रकरणी तक्रार फेटाळली; सह धर्मादाय आयुक्तांचा निर्णय

शेअर करा

खासगी कंपनीला हॉल भाड्याने देण्याविरोधातील अर्ज नामंजूर; संबंधित कामावरील पूर्वीची स्थगितीही उठवली

सावंतवाडी,दि.०७ ऑगस्ट
सावंतवाडी येथील वैश्य भवन मधील हॉल खासगी कंपनीच्या कार्यालयासाठी भाड्याने देण्याच्या व कंपनीला हॉलमध्ये त्यासंबंधी काम करू देण्याच्या विरोधी सह धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांचेकडे दखल केलेला अर्ज सह आयुक्तांनी नामंजूर केला आहे. तसेच, संबंधित कामाला स्थगिती देणारा पूर्वीचा आदेशही रद्द केला आहे.

शहरातील गवळीतीठा येथील वैश्य भवनमधील हॉल ‘ग्रोबिन टेन्क्रॉलॉजी’ कंपनीला भाड्याने दिल्याचा निर्णय व त्या अनुसार ग्रोबिन टेक्रॉलॉजी कंपनीला हॉलच्या संरचनेत काही बदल किंवा त्याचा वापर करण्याम मनाई करण्यासाठी येथील श्री रमेश भाट व पुष्पलता कोरगावकर यांनी कोल्हापूर येथील सह धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दखल केला होता. या अर्जाच्या प्राथमिक सुनावणीमध्ये पुढील आदेश होईपर्यंत वैश्य भवन भवनमध्ये कोणतेही काम करू नये असा आदेश सह धर्मादाय आयुक्तांनी दिल होता.

या अर्जाच्या अंतिम सुनावणीनंतर सह धर्मादाय आयुक्तांनी आपल्या दिनांक २७ जुलै २०२६ च्या आदेशाद्वारे वरील अर्ज नामंजूर करून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेशही रद्द केला. सह धर्मादाय आयुक्तांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, ‘या प्रकरणातील परिस्थितीचा विचार करता सन १९९५ पासून कार्यरत डी-फॅक्टो विश्वस्तांनी न्यासाच्या जागेवर वेळावेळी बांधकाम केलेली आहेत व असे बांधकाम केलेल्या इमारतीमधील वेगवेगळे भाग वेगवेगळ्या व्यवसायाकरिता वेळोवेळी भाडयाने दिलेले आहेत व त्याबाबत वाद नाही. विरुद्ध पक्ष क्र. ३ ग्रोबिन टेक्रॉलॉजी यांना देखील या इमारतीचा भाग लिव्ह अॅण्ड लायसेन्सी कराराद्वारे भाडयाने दिल्याचे स्पष्ट होते, त्यामध्ये अशा कराराद्वारे न्यासाच्या मिळकतीचा अपव्यय, अन्य संक्रमण किंवा नुकसान होण्याचा धोका दिसून येत नाही. विरुद्ध पक्ष क्र. ३ ग्रोबिन टेक्नॉलॉजी यांनी देखील सकृतदर्शनी यथायोग्य चौकशी करुन न्यासासोबत करार केल्याचे दिसून येते व अशा करारातून पूर्वीपेक्षा न्यासाचे उत्पन्न निश्चितपणे वाढणार असल्याचे स्पष्ट होते. म्हणून या प्रकरणी तुर्तातूर्त मनाई हुकुम देण्याची आवश्यकता दिसून येत नाही.”

आपल्या आदेशात धर्मादाय आयुक्तांनी, न्यासाच्या मिळकतीबाबत विरोधी पक्षकारांकडून अपव्यय होण्याची किंवा नुकसान होण्याची किंवा अनुचितरित्या अन्य संक्रमित होण्याचा धोका किंवा विल्हेवाट लावण्याची परिस्थिती असण्याची शक्यता नसल्याचे, तसेच अर्जदारांच्या विनंतीनु‌सार भाडेकरू ग्रोबिन टेक्रॉलॉजी विरुद्ध न्यासाच्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अंतर्गत कामकाज किंवा अदलाबदल करण्यासाठी व सदर मिळकतीचा भाडेकरू म्हणून वापर करण्यामाठी मनाई आदेश जारी करण्याची आवश्यकता नसल्याचे निरीक्षण नोंदवित श्री रमेश भाट व पुष्पलता कोरगावकर यांचा अर्ज नामंजूर करून पूर्वी जारी केलेला जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेशही रद्द केला आहे.

शेअर करा