सावंतवाडी,दि.१३ जुलै
अयोध्या येथील श्री राम मंदिर मधील दानपेटीतील दान चोरी प्रकरणाबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘रघुपती राघव राजाराम’ कार्यक्रमाचे (आंदोलन) आयोजन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्या येथील कथित दान चोरी प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार हे पाऊल उचलण्यात आले.
या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच अँड दिलीप नार्वेकर, राजू मसूरकर,कौस्तुभ पेडणेकर, पीटर फर्नांडिस, आनंद परुळेकर, आफताब हेरेकर, प्रदिप चौगुले, भ. रा. कदम, समीर वंजारी, ज्ञानू मिशाळ, दयानंद लुडबे, अजिंक्य गावडे, अरुण भिसे, जेम्स फर्नांडिस यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते.