सावंतवाडीत सोमवार, १३ जुलै रोजी काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’

शेअर करा

अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी लूटप्रकरणाच्या निषेधार्थ श्री साई मंदिरात सकाळी ११ वाजता पसायदान व भजनाचे आयोजन

सावंतवाडी,दि.११ जुलै
अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मंदिरातील दानपेटीमध्ये लूट करणाऱ्या लोकांना सद्बुद्धी यावी, याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ करण्यात येणार आहे. या अंतर्गत सावंतवाडी तालुक्यात सोमवार, दिनांक १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ‘श्री साई मंदिर’ येथे पसायदान व भजन आयोजित करण्यात आले आहे.
​या संदर्भातील अधिकृत पत्र सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय घन:श्याम मालवणकर यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना देऊन या आंदोलनाची रीतसर नोंद घेण्यासाठी निवेदन दिले आहे
​महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे आंदोलन छेडण्यात येत आहे. सावंतवाडी येथील साई मंदिरात होणाऱ्या या भजनात्मक सत्याग्रहात परिसरातील बहुसंख्य रामभक्त आणि काँग्रेस कार्यकर्ते सामील होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांनी दिली आहे.

शेअर करा