सावंतवाडी मतदारसंघात‘सेवा अभियानाला’ जोरदार सुरुवात

शेअर करा

सावंतवाडी,दि.२४ ऑगस्ट

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे व नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदने सादर करण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक साखरे तसेच महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजपा कोकण विभागाचे संयोजक व प्रदेश प्रवक्ते प्रमोद जठार यांच्याकडे निवेदन सुपूर्द करताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जि. प. सदस्य संदीप गावडे, कासचे सरपंच प्रविण पंडित, माजी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे हे अभियान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य तथा भाजपा कोकण विभागाचे संयोजक व प्रदेश प्रवक्ते प्रमोद जठार तसेच संतोष साखरे नागरिकांकडून निवेदने स्वीकारली.

शेअर करा