Sawantwadi Crime :सावंतवाडीत दुकानगाळ्याचे कुलूप कापून अनधिकृत प्रवेश; पोलिसांत गुन्हा दाखल

शेअर करा

बाहेरचावाडा येथील घटना; उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची घटनास्थळी भेट, पुढील तपास सुरू

सावंतवाडी,दि.१८ ऑक्टोंबर

बाहेरचावाडा, कोलगाव दरवाजाजवळ फिर्यादीच्या मालकीच्या दुकानगाळ्याचे कुलूप परस्पर कापून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्र मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडला. फिर्यादी दयानंद देवराम केनवडेकर (वय ७३, रा. बाहेरचावाडा, कोलगाव दरवाज्याजवळ, सावंतवाडी) यांच्या घरालगत असलेल्या २५८ बी या दुकानगाळ्याला फिर्यादी यांनी कुलूप लावले होते. आरोपी इम्रान नजीर बेग (वय ४०, रा. झिरंगवाडी, सावंतवाडी) याने फिर्यादीच्या संमतीशिवाय दुकानगाळ्याचे कुलूप कापून आतमध्ये अनधिकृत प्रवेश केला आणि कुलूप तोडून नुकसान केले. या प्रकरणी फिर्यादी दयानंद केनवडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भागवत आणि सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. शिंगाडे करत आहेत.

शेअर करा