पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांची आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून मागणी; दर महिन्याला एकदा सोमवारी कायमस्वरूपी ओपीडी सुरू करण्याचा आग्रह.
सावंतवाडी,दि.२२ जुलै
बेळगाव केएलई रुग्णालयाची बाह्यरुग्ण तपासणी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी दर महिन्यातून एकदा सोमवारी सुरू करावी अशी मागणी आंबोली पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी आमदार प्रतिनिधी रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून केली.
आमदार दीपक केसरकर यांचे मागणीपत्र घेऊन बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्यासाठीची विनंती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर व केएलई रुग्णालय बेळगावचे अधिकारी डॉ.आलम प्रभू यांच्याकडे करण्यात आली. यामुळे आंबोली, चौकुळ, गेळे भागातील रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मायकल डिसोजा यांनी याकडे लक्ष वेधले.
आमदार दीपकभाई केसरकर यांच्या पाठपुराव्याने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत रुग्ण कल्याण नियामक समिती आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केले.यावेळी के.एल.ई चे जनसंपर्क अधिकारी राजू हडिमणी उपस्थित होते