Sawantwadi : धाकोरे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक संदेशातून जनजागृती

शेअर करा

निसर्ग, शेती, पाणी आणि जंगल संवर्धनासह गावाच्या भविष्याबाबत नागरिकांना आवाहन

सावंतवाडी,दि.१३ ऑक्टोंबर

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने धाकोरे येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच मंडळाच्या वतीने निसर्ग, शेती, पाणी, जंगल संवर्धन आणि गावाचे भविष्य या विषयांवर सामाजिक संदेश देत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवस दुर्गामातेची प्रतिष्ठापना करून धाकोरे परिसरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन दुर्गामातेचे दर्शन घेत आहेत आणि देवीचा आशीर्वाद घेत आहेत.

केवळ धार्मिक उत्सवापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या मंडळाच्या वतीने पर्यावरण संवर्धन, शेतीचे महत्त्व, पाण्याचे जतन, जंगलांचे संरक्षण तसेच गावाच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात संदेश देण्यात आले आहेत. निसर्गाचे रक्षण, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे.
मंडळाच्या या उपक्रमामुळे नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणीव जागृत करण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांमध्ये पर्यावरण आणि गावाच्या विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.

शेअर करा