सावंतवाडी भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्षपदी दिलीप जाधव यांची फेरनिवड

शेअर करा

सेक्रेटरीपदी चंद्रशेखर जाधव यांची फेरनिवड; वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारिणीची घोषणा

सावंतवाडी,दि.११ ऑगस्ट

भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडीची तालुका नवी कार्यकारणी सावंतवाडी ( प्रतिनिधी)भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीची नवी कार्यकारणी निवडण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी दिलीप अर्जुन जाधव व सेक्रेटरी पदी चंद्र शेखर मोहन जाधव यांची फेर निवड करण्यात आली आहे. तालुका कार्य करण्याची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सायंकाळी समाज मंदिर सभागृहात नऊ ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष आनंद कासारडेकर सचिव संजय पेनडूरकर संस्कार विभाग उपाध्यक्ष आर डी चेंडवणकर संघटक ad सत्यवान चेंज वन कर प्रचार व पर्यटन सचिव शंकर कदम इत्यादींच्या उपस्थितीत घेण्यात आली. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक इत्यादींच्या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर मागील वर्षीचा इतिवृत्त अहवाल जमाखर्च कार्य अहवाल वाचन झाल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आले त्यानंतर पुढील दोन वर्षे आहे

ते नवीन कार्य करणे निवडण्यात आले ते खालील प्रमाणे. अध्यक्ष दिलीप अर्जुन जाधव, सरचिटणीस चंद्रशेखर मोहन जाधव ,कोषाध्यक्ष मंगेश अनंत कदम ,उपाध्यक्ष ( संस्कार) सुनील नारायण जाधव सचिव मिलिंद बाळा नेमळेकर व विठ्ठल नारायण कदम ,उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) मोहन भिवा जाधव सचिव अनंत शिवराम कदम , यशवंत सिताराम जाधव ,उपाध्यक्ष (संरक्षण )वासुदेव सखाराम जाधव सचिव प्रशांत अंकुश कदम , गणपत महादेव जाधव हिशोब तपासणी स सिद्धार्थ भिवा जाधव संघटक लक्ष्मण निगुडकर ,रमाकांत जाधव सिद्धार्थ जाधव ,मोहन लाडू , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शालांत परीक्षेत शिरोडा केंद्रात प्रथम आलेल्या आरोशी मोहन जाधव गुण 96% व मैत्री प्रसाद सांगेलकर गुण 93% या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला

शेअर करा