सावंतवाडी, दि. १८ जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर जिल्हास्तरीय जुनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे २७ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील खेळाडू, पालक आणि शिक्षकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने कल्पना तेंडुलकर यांनी केले आहे.
स्पर्धेचे वयोगट, जन्मतारीख आणि खेळ प्रकार (इव्हेंट्स) खालीलप्रमाणे आहेत:
१४ वर्षांखालील मुले व मुली (जन्मतारीख २८ ऑक्टोबर २०१२ ते २७ ऑक्टोबर २०१४):
ट्रायाथलॉन अ: ६० मी. धावणे, लांब उडी, उंच उडी (सीझर).
ट्रायाथलॉन ब: ६० मी. धावणे, लांब उडी, बॅक थ्रो शॉटपुट (१ किलो).
ट्रायाथलॉन क: ६० मी. धावणे, ६०० मी. धावणे, लांब उडी.
वैयक्तिक इव्हेंट: १०० मी. धावणे (हा इव्हेंट जिल्हा व राज्य स्पर्धेसाठी असेल, राष्ट्रीय स्पर्धेसाठी नाही). सर्व खेळाडूंना ‘किड्स जॅव्हेलिन’ अनिवार्य राहील.
१६ वर्षांखालील मुले व मुली (जन्मतारीख २८ ऑक्टोबर २०१० ते २७ ऑक्टोबर २०१२):
६० मी. धावणे, ६०० मी. धावणे, ८० मी. हर्डल्स, उंच उडी (सीझर), लांब उडी, शॉटपुट (मुली ३ किलो, मुले ४ किलो), भालाफेक (५०० ग्रॅम), मेडले रिले.
पेंटाथलॉन: पहिल्या दिवशी ६० मी. धावणे, ८० मी. धावणे, लांब उडी; दुसऱ्या दिवशी गोळाफेक, ६०० मी. धावणे.
१८ वर्षांखालील मुले व मुली (जन्मतारीख २८ ऑक्टोबर २००८ ते २७ ऑक्टोबर २०१०):
१०० मी., २०० मी., ४०० मी., १००० मी. धावणे, हर्डल्स (मुली १०० मी., मुले ११० मी.), उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, ३००० मी. स्टीपल चेस, ५००० मी. चालणे, मेडले रिले.
हेप्टाथलॉन: पहिल्या दिवशी ११०/१०० मी. हर्डल्स, उंच उडी, गोळाफेक, २०० मी.; दुसऱ्या दिवशी लांब उडी, भालाफेक, १००० मी. धावणे.
२० वर्षांखालील मुले व मुली (जन्मतारीख २८ ऑक्टोबर २००६ ते २७ ऑक्टोबर २००८):
१०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी., ३००० मी., ५००० मी. धावणे, हर्डल्स, उंच उडी, लांब उडी, ट्रिपल उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, रिले (४×१०० व ४×४००), ५००० मी. चालणे.
डेकॅथलॉन: पहिल्या दिवशी १०० मी. धावणे, लांब उडी, गोळाफेक, उंच उडी, ४०० मी.; दुसऱ्या दिवशी हर्डल्स, थाळीफेक, बांबू उडी, भालाफेक, १५०० मी. धावणे.
स्पर्धेचे नियम व महत्त्वाच्या सूचना:
१) प्रत्येक इव्हेंटमधून पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड केली जाईल. प्रथम क्रमांकाचे खेळाडू न गेल्यास पुढील खेळाडूंना संधी दिली जाईल.
२) एक खेळाडू जास्तीत जास्त २ वैयक्तिक आणि १ सांघिक इव्हेंटमध्ये भाग घेऊ शकतो.
३) जिल्हा व राज्य स्पर्धेचा प्रवास, निवास, भोजन व नाश्ता खर्च खेळाडूंना स्वतः करावा लागेल. स्पर्धेदरम्यान खेळाडू आजारी पडल्यास किंवा अपघात झाल्यास पालकांनी जबाबदारी घ्यावी, असोसिएशन जबाबदार राहणार नाही.
४) राज्य स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंना ‘UID’ क्रमांक असणे आवश्यक आहे.
५) सर्व खेळाडूंना स्पर्धा नोंदणी शुल्क देणे अनिवार्य आहे.
६) इतर जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतल्यास त्यांच्या मूळ जिल्ह्यातील ॲथलेटिक्स असोसिएशनचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) सादर करणे आवश्यक आहे. हे खेळाडू प्राविण्य मिळवू शकतात, परंतु या प्रमाणपत्राचा उपयोग गुणांसाठी किंवा नोकरीसाठी करता येणार नाही.
७) वेस्ट झोन आणि ऑक्टोबरमध्ये चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड राज्य स्पर्धेतून केली जाईल.
स्पर्धेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची लिंक लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. अधिक माहितीसाठी कल्पना तेंडुलकर (९३५९३९६४५०) किंवा बाळ कदम (९१६७४६७७९६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.