सावंतवाडीत १५ ऑगस्टला आमदार दीपक केसरकर पुरस्कृत जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा

शेअर करा

सावंतवाडी दि.११ ऑगस्ट
येथील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्र मंडळातर्फे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या पुरस्कृत तसेच कै. राजन म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ निमंत्रित जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे (३१ वे वर्ष) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने होणार आहे.
​ही स्पर्धा शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जय प्रकाश चौक येथील शांतिनिकेतन स्कूलच्या मैदानावर रंगणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक १० हजार रुपये व चषक, तर उपविजेत्या संघाला ७ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि अष्टपैलू खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिकेही दिली जातील.
​या स्पर्धेत जिल्ह्यातील १० निमंत्रित संघ सहभागी होणार असून संघ नोंदणीची अंतिम मुदत १४ ऑगस्टपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी श्री. नरेश डोंगरे (९६०४०३६३८३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा