सावंतवाडी : इन्सुली येथे २७ ऑगस्टला जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा

शेअर करा

सावंतवाडी,दि.०५ ऑगस्ट
विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली यांच्या वतीने श्री. गुरुनाथ शंकर पेडणेकर (माजी शिक्षण व आरोग्य सभापती जि. प. सिंधुदुर्ग) पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे (वर्ष तिसरे) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली, ता. सावंतवाडी येथे पार पडणार आहे.
​स्पर्धा दोन गटांत घेतली जाणार आहे:
​गट क्रमांक १ (इयत्ता ५ वी ते ७ वी):
​विषय: १) भारतीय संस्कृती, २) चांगला नागरिक कसा असावा
​वेळ: ४ मिनिटे
​गट क्रमांक २ (इयत्ता ८ वी ते १० वी):
​विषय: १) आजच्या युवकांसमोरील आव्हाने, २) कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना संधी
​वेळ: ६ मिनिटे
​पारितोषिके (दोन्ही गटांसाठी):
प्रथम क्रमांक – ₹२००१, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र; द्वितीय क्रमांक – ₹१५०१, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र; तृतीय क्रमांक – ₹१००१, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ (दोन) – प्रत्येकी ₹५०१, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त ३० स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
​स्पर्धेचे नियम व अटी:
एका शाळेतील प्रत्येक गटातील एकच स्पर्धक पाठवावा. स्पर्धकांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे सही-शिक्याचे पत्र सोबत आणावे. स्पर्धकाने दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर भाषण करावे व आपले भाषण स्वहस्ताक्षरात लिहून आणावे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धास्थळी स्पर्धक व सोबत येणाऱ्या एका व्यक्तीची नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
​नावनोंदणी:
स्पर्धकांनी शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी श्री. एस. एम. शेवाळे (९४२३३०५११६), सौ. व्ही. व्ही. पालव (९१४६२३७७४३), सौ. ए. पी. सावंत (९४२१६२१४६७) किंवा श्री. जी. एस. पेडणेकर (९४२२४३४८६४) यांच्याशी संपर्क साधावा. व्हॉट्सॲप मेसेजद्वारेही नावनोंदणी करता येईल, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा