सावंतवाडीच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापकपदी डॉ. श्रीनिवास जाधव यांची नियुक्ती

शेअर करा

प्रसूती व स्त्रीरोग विभागाला १० वर्षांपेक्षा अधिक अनुभवाचा लाभ

सावंतवाडी,दि.२६ सप्टेंबर
येथील राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय व भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात प्रसूती आणि स्त्री रोग विभागात सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) म्हणून प्रा. डॉ. श्रीनिवास जाधव (MS, PhD) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग तसेच सावंतवाडी तालुका आणि परिसरातील माता व रुग्णांना आता उच्च दर्जाचे उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. डॉ. श्रीनिवास जाधव स्त्री रोग तज्ञ यांना या क्षेत्रातील १० वर्षांपेक्षा अधिक काळचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आपले एम.एस. (M S) चे उच्च शिक्षण बेंगलोर (कर्नाटक) येथून, तर पी.एच.डी. (PhD) चे शिक्षण पारुल युनिव्हर्सिटी (गुजरात) येथून पूर्ण केले आहे. त्यांच्या तसेच नांदेड जिल्हा गुजरात मध्ये काही रुग्णालयामध्ये आपल्या प्रदीर्घ रुग्णसेवा बजावली होती व नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या प्रसूती व स्त्री रोग विभागाची क्षमता अधिक बळकट झाली आहे.रुग्णालयात सिझेरियन व गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया यशस्वी डॉ. श्रीनिवास जाधव यांच्या मार्गदर्शना खाली नुकतीच भाईसाहेब सावंत या रुग्णालयात एक सिझेरियन डिलिव्हरी (शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती) यशस्वीरित्या पार पडली. माता व बाळ दोन्ही सुखरूप असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय, इतरही अनेक क्लिष्ट स्त्री रोगांवर आणि गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया (Surgeries) येथे यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.वंध्यत्व निवारण व इतर उपचारांची सुविधाया रुग्णालयात आता गर्भिणी मातांची विशेष काळजी, स्त्री व पुरुष वंध्यत्व (Infertility) यांसारख्या गंभीर समस्यांवर आधुनिक आयुर्वेदिक पद्धतीने उपचार आणि योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. सिंधुदुर्ग तसेच सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नुकतीच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांनी सदिच्छा भेट घेऊन भाऊसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेज या रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टर श्रीनिवास जाधव स्त्री रोगतज्ञ यांची. सदिच्छा भेट घेण्यात आली त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून व समस्या बाबत माहिती घेण्यात आली तसेच या “नव नियुक्त “डॉक्टर श्रीनिवास जाधव स्त्रीरोगतज्ञ यांचे स्वागत करून पुष्पगुच्छ राजू मसूरकर देण्यात आले या रुग्णालयामध्ये डॉक्टर राजेश गुप्ता तसेच अनेक तज्ञ डॉक्टर या भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक रुग्णालया मिळाल्याने जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी समाधान व्यक्त केले आहे गोरगरिबांना या रुग्णालयामध्ये चांगली सेवा मिळत आहेत तसेच पंचकर्म सुद्धा या रुग्णालयामध्ये मिळले जातात तसे अनेक पॅलेसिस रुग्ण हे डॉक्टर देवऋषी त्यांच्याकडून सुद्धा ज्यावेळी पॅरॅलिसिस रुग्णाला पंचकर्माची गरज असते त्यावेळी असे रुग्ण मी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने अनेक रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने पंचकर्म व नंतर फिजिओथेरपी असे रुग्ण मी या भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये नेहमीच पाठवत असतो अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दिली आहे

शेअर करा