सावंतवाडी,दि.२४ ऑगस्ट
मळगाव देऊळवाडी येथील रहिवासी सौ. सुमित्रा दशरथ मळगावकर (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सुमित्रा मळगावकर या आपल्या पुतणीसोबत गॅस सिलेंडर आणण्यासाठी गेल्या होत्या. वाटेत अचानक पाय घसरून पडल्यामुळे त्यांना अपघात झाला आणि त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पुतणी, पुतण्या असा परिवार आहे. या आकस्मिक घटनेमुळे मळगाव परिसरात, मळगावकर कुटुंबावर, नातेवाईकांवर व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. याबाबतची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी दिली.