मराठीसह इंग्रजी भाषणातून विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आत्मविश्वास; इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचा उपक्रम
सावंतवाडी ,दि.११ ऑगस्ट
नेमळे विद्यालयात क्रांतिदिनाचे औचित्य साधून पाचवी ते आठवी लहान गट व नववी ते बारावी यामोठ्या गटात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यालयातील बारा विद्यार्थ्यांनी मराठीत भाषण केले व अकरा विद्यार्थ्यांनी इंग्रजीत भाषण केले.सांस्कृतिक विभागाच्या वतीने यावर्षी मुलांनी इंग्रजीत भाषण करून इंग्रजी बद्दल इतर मुलांच्यात वाटणारी भीती दूर व्हावी व जास्तीजास्त विद्यार्थ्यांना बोलते करावे हा एक हेेतू होता . त्याला लहान गटातून व मोठ्या गटातून चांगलाच प्रतिसाद मिळाला . विशेष कौतुक शिक्षकांनी मुलांचे केले.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य आर.के.राठोड यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक राजेश गुडेकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल कांबळे , उमेश राऊळ, एम.पी.सारंग,चंद्रकांत बंगाल, नेत्रा चव्हाण , क्रांती मयेकर,एन .कडावलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले.सांस्कृतिक मंत्री सायली आळवे हिने सर्व शिक्षकांचे पुष्प देऊन स्वागत केले.
सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर विश्वास ठेवून अनेक क्रांतिकारकांनीइंग्रजी सत्तेविरुद्ध संघर्ष करून आपल्या ध्येय पूर्ती करीता क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.याक्रांतीकारकांचा इतिहास विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायची आवश्यकता आहे.असे प्रमुख मार्गदर्शक राजेश गुडेकर यांनी याप्रसंगी उद्गार काढले .
लहान गटात मराठी भाषणात प्रथम क्रमांक -हरिश्चंद्र संतोष गुडेकर ( आठवी), द्वितीय क्रमांक- हर्ष आनंद रेडकर ( आठवी),तृतीय क्रमांक- अथर्व अर्जुन राऊळ( सातवी)
लहान गट इंग्रजी भाषणात प्रथम क्रमांक- ध्रुव अनिल परुळेकर ( सहावी), द्वितीय क्रमांक-वैभवी पांडुरंग पाटकर ( सहावी), तृतीय क्रमांक- जय परशुराम ठाकर( सहावी)
मोठा गट मराठी भाषणात प्रथम क्रमांक – कुणाल चंद्रकांत मयेकर ( अकरावी), निमिष उमेश राऊळ ( दहावी), तृतीय क्रमांक- आयुष सुरेश नाईक ( बारावी)
इंग्रजीत मोठा गट भाषण प्रथम क्रमांक- सोनाक्षी बाजीराव दळवी ( नववी), द्वितीय क्रमांक- हाफिजा
सर्फराज आजगावकर ( दहावी), तृतीय क्रमांक- लतिक मेस्री ( नववी)
यास्पर्धेचे परीक्षण एम.पी सारंग व नेत्रा चव्हाण यांनी केले .उमेश राऊळ यांच्या हस्ते सर्व यशप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल कांबळे यांनी केले .आभार सी.टी.बंगाळ यांनी मानले.