सावंतवाडी : पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेअर करा

प्रा. सतीश बागवे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची घेतली भेट; आपत्ती व्यवस्थापनासाठी संस्थेची सहकार्याची तयारी व्यक्त

सावंतवाडी,दि.११ जुलै

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेटून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी निवेदन सादर केले. या वर्षी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था प्रशासनाला सहकार्य तयार आहेत याबाबतचे हे निवेदन देण्यात आले.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सेवाभावी उपक्रम पाहून तृप्ती धोडमिसे यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रतिभा वराळे यांची देखील भेट घेऊन उपक्रमाबाबत माहिती दिली. सावंतवाडी समाज मंदिर येथे असलेली दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी धडपड करणारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सदस्या रूपा मुद्राळे यांनी विविध योजनेचा दिव्यांग मुलांना लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यास विनंती केली असता आपल्याकडून नक्कीच दिव्यांग मुलांसाठी तसेच बांधवांसाठी सहकार्य केले जाईल असे सांगण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था नोंदणीकृत संस्था असून,सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य या विषयांमध्ये ही संस्था सतत कार्यरत असते. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये गेली 6 वर्षे ही संस्था नागरिकांना 24 तास विनामूल्य सेवा देत आलेली आहे. वादळी पावसामध्ये रस्त्यावर पडणारी झाडे, घरावर पडणारी स्वखर्चाने तोडून नागरिकांना सहकार्य करते. तसेच पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा या संस्थेतील कार्यकर्ते तत्काळ मदत कार्य करून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतात.
याहीवर्षी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था प्रशासनाला सहकार्य करण्याबाबतचे निवेदन दिले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.

शेअर करा