सावंतवाडी : गवा रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, उपजिल्हा रुग्णालयात दाखल

शेअर करा

सावंतवाडी,दि.०४ ऑगस्ट
सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंग, गोठावेवाडी येथील शेतकरी सोमण विठ्ठल घावरे,( ७० वर्ष) यांच्यावर गवा रेड्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ते गंभीर झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घावरे हे आपल्या भात शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोकीला व मानेला गंभीर दुखापत झाली आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या गवेरेडे वावर वाढला असून त्यांनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आताच कोठे शेतीची कामे संपत आली आहेत. मात्र या जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवा मुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेअर करा