उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी,दि. १८ ऑगस्ट
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या, बुधवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी ठीक १०.३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे पार पडणार आहे.
या विशेष कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्री. उदय सामंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. दीपक केसरकर तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात साजरा होणार आहे.
या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि संजू परब यांच्या सर्व स्नेह्यांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.