आरोंदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अभिवादन; हुतात्मा केशव अनंत घुर्ये यांच्या स्मृतींना उजाळा
सावंतवाडी दि.१३ ऑगस्ट
आरोंदा येथील हुतात्मा स्मारकाला आरोंदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने क्रांती दिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
आरोंदा येथे हुतात्मा केशव अनंत घुर्ये स्मारक आहे. या ठिकाणी क्रांती दिनानिमित्त आरोंदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाई देऊलकर यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी घुर्ये यांचे वंशज द्वारकानाथ घुर्ये, मुख्याध्यापक सिध्दार्थ तांबे, श्री राठोड, श्री वसावे, श्री गावडे,व शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.