सावंतवाडीत आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना धान्य वाटप

शेअर करा

भाजपच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम; गरजू कुटुंबांना धान्याचे वितरण

सावंतवाडी ,दि.२१ सप्टेंबर

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. भाजपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करण्यात आली. गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गौरव जाधव, अशोक पेडणेकर आदी उपस्थित होते.

शेअर करा