सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘वनसंवर्धन-आपले कर्तव्य’ कार्यक्रम उत्साहात

शेअर करा

सावंतवाडी,दि.०४ जुन

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभाग – सावंतवाडी वन परिक्षेत्र – सावंतवाडी यांच्याकडून ‘वनसंवर्धन-आपले कर्तव्य’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एकच ध्येय -स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन असा नारा देत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नरेंद्र डोंगर येथे प्लास्टिक गोळा करून विल्हेवाट लावणे तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे‌. नरेंद्र डोगर, सावंतवाडी येथे सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार असून पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन वनविभाग, सावंतवाडी वन परिक्षेत्र, सावंतवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.

शेअर करा