सावंतवाडी,दि.०७ सप्टेंबर
सावंतवाडी सालईवाडा मिलाग्रीस हायस्कूल येथील रहिवासी सूर्यकांत रावजी सुभेदार (वय ७०) यांचे शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाले.
ते सावंतवाडी एसटी आगारात वाहक (कंडक्टर) म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले होते. आपल्या दिलखुलास स्वभावासाठी ते सर्वपरिचित होते. रविवारी दुपारी त्यांचे पार्थिव गोवा-बांबोळी येथून सावंतवाडी येथे आणण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंतिम दर्शन घेऊन सुभेदार कुटुंबियांचे सांत्वन केले. रविवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नल सुजित सुभेदार आणि केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे अजित सुभेदार यांचे ते वडील, तर सावंतवाडीतील पाटणकर गॅस एजन्सीच्या ऋचा पाटणकर यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, तीन बहिणी, जावई, भावोजी व नातवंडे असा परिवार आहे