सावंतवाडी,दि.०५ सप्टेंबर
आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या एच. एस.सी.बॅच १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेसाठी इन्व्हर्टर व बॅटरीची व्यवस्था करून त्याचे फिटिंग करून दिले.
वीजपुरवठा खंडित झाल्यास शाळेतील शैक्षणिक कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी या इन्व्हर्टरचा मोठा उपयोग होणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती जपलेले प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या मोलाच्या सहकार्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक उत्तम भागीत तसेच ग्रामस्थांनी एच .एस. सी बॅच १९९५-९६ मधील सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.