सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले व सावंतवाडीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

शेअर करा

१८ आणि २० जुलै रोजी नागरिकांसाठी विशेष आरोग्य सेवा; विविध आजारांची मोफत तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन उपलब्ध होणार.

सावंतवाडी दि.१३ जुलै

वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर येत्या १८ आणि २० जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे
आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस येत्या १८ जुलै रोजी आहे. या निमित्ताने वेंगुर्ले येथे डेरवण हॉस्पिटलचा दि.१८ जुलै रोजी आरोग्य तपासणी कॅम्प तर दि. २० जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बेळगाव केईली चा कॅम्प होणार आहे. या शिबिरात शस्त्रक्रिया करण्याचे तपासणीत उघड झाले तर त्या तपासणी करणाऱ्या रुग्णालयात करण्यात येणार आहे.
वेंगुर्ले येथील तपासणी करणाऱ्या डेरवण येथील रुग्णालयाच्या रुग्णालयात तर सावंतवाडी येथे तपासणी होणाऱ्या केईली बेळगाव रुग्णालयात ह्या शस्त्रक्रिया होणार आहेत. आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना समन्वयक सचिन वालावलकर यांनी या बाबत माहिती देऊन या दोन्ही आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा