सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे महिला व मुलींसाठी विविध मोफत प्रशिक्षण वर्गांचे आयोजन; २० ऑगस्टपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन

शेअर करा

सावंतवाडी,दि.१२ ऑगस्ट
सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत शहरातील महिला तसेच मुलींसाठी विविध प्रकारच्या मोफत प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील रोजगाराभिमुख व कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे.

​नगरपरिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणांमध्ये खालील विषयांचा समावेश आहे:
​हॉटेलिंग केटरिंग व कुकिंग प्रशिक्षण: विविध प्रकारचे स्नॅक्स बनवणे, माशांपासून (फिश) विविध चविष्ट पदार्थ तयार करणे व इतर खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक.
​वाहन चालकाचे प्रशिक्षण: फोर व्हीलर (चारचाकी) आणि टू व्हीलर (दुचाकी) चालवण्याचे प्रशिक्षण.
​अॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण: आधुनिक फॅशन डिझायनिंगचे बारकावे शिकवणे.
​स्वरक्षणाचे प्रशिक्षण: महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘Self-Defense’ (कराटे) चे विशेष प्रशिक्षण.
​संगणक व AI प्रशिक्षण: MS-CIT संगणक कोर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कार्ड बनवण्याचे तंत्रज्ञान यांसारखे विविध अद्ययावत संगणकीय प्रशिक्षण.
​नाव नोंदणीची मुदत व ठिकाण:
या सर्व प्रशिक्षण वर्गांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सावंतवाडी शहरातील महिला व मुलींनी आपली नावे दिनांक २० ऑगस्ट २०२६ पर्यंत सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयातील श्रीम. परवीन शेख यांच्याकडे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
​या संधीचा लाभ शहरातील सर्व महिला व मुलींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष सौ. श्रद्धा सावंत भोसले, उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंदकर, महिला व बालकल्याण सभापती श्रीम. दिपाली भालेकर आणि उपसभापती श्रीम. सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.

शेअर करा