सावंतवाडी : दुष्काळातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम आता गणेशोत्सव मंडळांनी करावे! उपसभापती सचिन अहिर यांचे भावनिक आवाहन

शेअर करा

सावंतवाडी,दि.२६ सप्टेंबर

सर्व समाजबांधवांना एकत्र आणणारी, लोकर्पण कामांना प्रोत्साहन देणारी लोकमान्य टिळक यांची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संकल्पना आता अधिक ‌वेगाने पुढे गेली पाहिजे,कोरड्या दुष्काळात शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या कामात आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी येथे आपल्या भाषणात केले आहे.
नायगांव संलग्न परिसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नायगावे श्वर महागणपतीचे दर्शन काल अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला उपसभापती सचिन अहिर यांनी घेतले.प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गोपाळे,कार्याध्यक्ष संदीप नार्वेकर,सरचिटणीस मयुरेश (मन)मोरे, खजिनदार विशाल पाटील आदींनी उपसभापती सचिन अहिर यांचे शाल-श्रीफळाने स्वागत केले.त्यावेळी माजी नगरसे वक सुनील अहिर,रा.मि.म.संघाच्या सेक्रेटरी ऐश्वर्या अहिर उपस्थित होते.
दोनच दिवसापूर्वी कामगारांचे बाहूल असलेल्या स्प्रिंग मिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ(वर्षे ७०वे)चे अध्यक्ष आमदार कालिदास कोळमकर,यांनी तर सार्वजनिक गणेशोत्सव बाळ गोपाळ गोपाळ मंडळ (वर्षे ५८वे)टाटा कंपाऊंड,परळच्या सम्राटचे अध्यक्ष शिवाजी काळे यांनी सचिन अहिर यांचे शाल-श्रीफळाने स्वागत केले‌ होते.
नायगावच्या ९७ व्या वर्षाच्या यशस्वी वाटचालीचे स्वागत करून सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले,शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुंबईतील गणेशोत्सव मंडळाची संख्या माफक असून, त्यामध्ये नायगावच्या गणेशोत्सव मंडळाचा समावेश होतो.आण खी तीन वर्षांने मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करील,असा उल्लेख करून सचिन अहिर म्हणाले,आज दोन महिने पावसाने ओढ घेतली आहे,उभी पिके करपून महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे, त्यातून बळीराजा चिंतेत पडला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सुमित्राजी अजितदादा पवार दुष्काळातून मार्ग काढण्याचा कृतीबद्ध प्रयत्न करीत आहेत,मात्र गणेशोत्सव मंडळाने त्यात आपल्या परीने मदतीचा वाटा उचलने आता काळाची गरज येऊन ठेपली आहे,असे सांगून सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात, पुणे येथील वास्तुत लोकमान्य टिळक यांच्याद्वारे, जी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना आकारास आली,त्या स्मृतींना उजाळा देऊन,उपस्थित भाविकांमध्ये चैतन्य जागविले

शेअर करा