सावंतवाडीत गोविंदांचा दहीहंडीचा जल्लोष

शेअर करा

अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाने फोडली मानाची दहीहंडी; हंड्या फोडण्यासाठी गोविंदांचा उत्साहात प्रारंभ

सावंतवाडी,दि.०५ सप्टेंबर

गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात गोविंदांनी मैदानात उतरत दहीहंडी फोडली. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाच्या माध्यमातून मानाची दहीहंडी फोडत सावंतवाडी शहरातील उर्वरित हंड्या फोडण्यासाठी प्रारंभ करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

पडते यांच्या निवासस्थानातील कृष्णमुर्ती घेऊन गोविंदा पुढे मार्गस्थ झाले. संस्थानकालीन मुरलीधर मंदिर इथं धार्मिक कार्यक्रमासह आरती करण्यात आली. यानंतर चिमुकल्याने थरावर चढत मानाची हंडी फोडली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अमेय तेंडोलकर म्हणाले, सामाजिक भान जपत आम्ही हे कार्य गेली १५ वर्ष करत आहोत. यातून मिळणारा निधी सामाजिक कार्यासाठी व्यथित करतो. सर्वधर्मांचे युवक एकत्र येऊन हा सण साजरा करतो असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेत असताना चौकाचौकातील दहीहंड्या फोडण्यात आल्या. मोठ्या जल्लोषात हे गोविंदा पहायला मिळाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमेय तेंडोलकर, सभापती प्रतीक बांदेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकुर, अरूण घाडी, संदीप इंगळे, मयूर लाखे, धनंजय परब, सनी जाधव, दिनेश जाधव आदींसह गोविंदा मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित होते.

शेअर करा