​​सावंतवाडी: सांगेलीत आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त भव्य वृक्षारोपण

शेअर करा

गिरीजानाथ दुग्ध सहकारी संस्थेचा पर्यावरणपूरक उपक्रम; माध्यमिक विद्यालयाच्या आवारात ५० रोपांची लागवड, ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश.

सावंतवाडी,दि.१० जुलै

आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहाचे निमित्त साधून सांगेली (ता. सावंतवाडी) येथील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात ‘गिरीजानाथ दुग्ध सहकारी संस्था, सांगेली’ यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “झाडे लावा झाडे जगवा” या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज ओळखून या उदात्त उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाच्या परिसरात ५० नवीन रोपे लावण्यात आली.
​सदर वृक्षारोपण सोहळा सिंधुदुर्गचे माजी डी.वाय.एस.पी. श्री. दयानंद गवस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. पंढरीनाथ राऊळ, दुग्ध संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव कविटकर, सांगेलीचे सरपंच श्री. लवु भिंगारे, उपसरपंच श्री. संतोष नार्वेकर, सागर सांगेलेकर, रमाकांत राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, पोलिस पाटील श्री. विठ्ठल डोईफोडे आणि माजी प्राचार्य श्री. रामचंद्र घावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
​या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. पंढरीनाथ पु. राऊळ, सचिव श्री. विश्वनाथ राऊळ, उपाध्यक्ष श्री. सुरजी राऊळ यांच्यासह श्री. महेश रेमुळकर, श्री. वामन नार्वेकर, श्री. गुरूप्रसाद राऊळ, श्री. वसंत रेमुळकर, श्री. विनायक सावंत, श्री. दिनेश सावंत, श्री. बाळा सरगांवकर, श्री. राकेश देवकर, श्री. बाळा राऊळ, श्री. आनंद राऊळ, श्री. महेश राऊळ, श्री. रोहित राणे तसेच हायस्कूलचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा