​सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेतर्फे समूहगीत स्पर्धा व गुणवंतांचा सत्कार

शेअर करा

१५ ऑगस्टला विविध कार्यक्रमांचे आयोजन

​सावंतवाडी,दि.१२ ऑगस्ट
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने १५ ऑगस्ट २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त इतर प्रबोधनात्मक विषयांची आवड निर्माण व्हावी व त्यांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
​हा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात पार पडणार आहे.
​समूहगीत स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये घेतली जाणार आहे. याशिवाय शहरातील सर्व शाळांमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी केला जाणार आहे.
​या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंतभोसले, उपनगराध्यक्ष अॅड. श्री. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी श्री. विनायक औंधकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर आणि उपसभापती सौ. सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.

शेअर करा