सावंतवाडी : ज्ञानदीप तर्फे मुख्याध्यापक आर‌ के राठोड यांचा सन्मान.

शेअर करा

सावंतवाडी,दि.३० जून

सावंतवाडी.. येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे नेमळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चे नूतन मुख्याध्यापक आर के राठोड यांचा संस्थापक वाय पी नाईक यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी अठ्ठावीस वर्षे उत्तम सेवा बजावली.विविध क्रीडा प्रकारात
त्यांचे विद्यार्थी जिल्हा व राज्य स्तरावर ग्रामीण भागातून विजेते ठरले.एक विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्याचा सार्थ अभिमान ज्ञानदीप मंडळाला वाटतो
अशा गुणवंत शिक्षकाची मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
ज्ञानदीप मंडळ जिल्ह्यातील गेली वीस वर्षे गुणवंतांचा गौरव करते.प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी काम करायला कौतुकाची थाप महत्त्वाची असते.यावेळी आर के राठोड यांनी सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शेअर करा