सावंतवाडी ,दि.१८ जुलै
वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुका शिवसेना, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना समन्वयक सचिन वालावलकर मित्रमंडळ,भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय डेरवण-रत्नागिरी व उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उदघाटनवेळी व्यासपीठावर वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर,ओरोस जिल्हा रुग्णालयाचे डॉ सुबोध इंगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळा दळवी, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, नगरसेविका लीना म्हापणकर, समिधा रेडकर, पंचायत समिती सदस्य साक्षी नार्वेकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विष्णूदास उर्फ दादा कुबल, कोचरा सरपंच योगेश तेली, महिला आघाडीच्या शीतल साळगावकर, वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र लिलके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश चौगुले, वैद्यकीय अधिकारी स्वप्नाली माने, डॉ मालखेडे आदी उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून करण्यात आले. युवासेनेचे तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, पंकज शिरसाट, प्रथमेश सावंत, सत्यवान साटेलकर, संजय परब, संतोष परब, मितेश परब, कौशिक परब, संजय गावडे, काशिनाथ नार्वेकर, दत्ता साळगावकर, अण्णा वजराटकर, उमेश नाईक, बाबल केरकर, संदेश सडवेलकर, युवती सेनेच्या तालुका संघटक पूजा सोन्सुरकर, ज्योत्स्ना खराडे, नीलम वराडकर, उभादांडा उपसरपंच टीना अल्मेडा, मातोंड ग्रामपंचायत सदस्य दीपेश परब, विशाल राऊत, स्वप्नील होसमणी आदी उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा कोचरेकर यांनी केले, तर आभार युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी मानले.

डेरवण हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी या शिबिरात जनरल फिजिशियन, डॉ. तेजस राणे डॉ. विवेक सूर्यवंशी, जनरल सर्जन डॉ शमा खान, कान- नाक- घसा तज्ञ डॉ.पूजा गीते, त्वचारोग तज्ञ डॉ.नागनाथ मोरे, नेत्ररोग तज्ञ डॉ. पृथ्वीराज मोहिते, अस्तिरोग तज्ञ डॉ. राजवर्धन देशमुख,
फिजिओथेरपी डॉ. विजयालक्ष्मी राव, डॉ. किरण कुंटे, डॉ. शुभम धारगळकर, डॉ, सत्यम आगलावे, डॉ, शिव मुंडे आदी डॉक्टर टीमच्या वतीने तपासणी करण्यात आली.
४३७ रुग्णांनी घेतला लाभ:
या आरोग्य शिबिराला वेंगुर्ले तालुक्यातील विविध गावातील असंख्य गरजू रुग्णांनी गर्दी केली होती. उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग करून रुग्णांची अतिशय काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्याची यादी तयार करून डेरवण येथील रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत. ४३७ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आमदार दीपक केसरकर हे जनकल्याणासाठी सतत कार्यरत आहेत. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य दिले. आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती केली. जनतेच्या आरोग्याशी संबंधित शिबिर आयोजित करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिले. असे त्यांनी सांगितले.