सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळी विविध भागांत जोरदार पावसाची हजेरी; सावंतवाडी,कुडाळसह काही भागात नागरिकांची दाणादाण

शेअर करा

सावंतवाडी,दि.२९ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज संध्याकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन विविध ठिकाणी मुसळधार ते हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. दिवसभर असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर आणि ढगाळ हवामानानंतर संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून पाऊसाची वाट पाहत शेतकरी बांधव बसले होते.
​सावंतवाडी ,कुडाळ शहर आणि आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. संध्याकाळच्या वेळी अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची आणि घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी आणि अंतर्गत भागातही काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.
​ गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या असह्य उकाड्यापासून या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
​हवामान खात्याने कोकण किनारपट्टीवर पुढील २४ तासांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा