शिवसेनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयास सिलींग व वॉल फॅनची भेट; देव्या सूर्याजी मित्रमंडळ व युवा रक्तदाता संघटनेचा पुढाकार
सावंतवाडी दि.१८ ऑगस्ट
शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या माध्यमातून येथील उपजिल्हा रुग्णालयास सिलींग फॅन व वॉल फॅन भेट देण्यात आले. तसेच नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ व युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयासाठी सिलींग व वॉल फॅन भेट स्वरूपात देण्यात आले. त्यानंतर नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ व युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनीही रक्तदान केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचारी श्रीकृष्ण सावंत, मनोहर कासकर, सुर्यकांत जाधव, सुवर्णा कोठावळे, दिव्या जाधव, संजय ऐडगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय सैन्यात आर्य गावडे यांची निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. तसेच चराठा येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, वृक्ष वाटप करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, माजी सभापती अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर,गुरू मठकर, परिक्षीत मांजरेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.