सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशांचा धडाका

शेअर करा

पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देण्याची सुरेश गवस यांची मागणी

​सावंतवाडी,दि.२ सप्टेंबर


सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अधिक बळकट आणि सक्षम करण्यासाठी मालवण-आडवली येथील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्षाचे सावंतवाडी येथील पक्षकार्यालय येथे जाहीर प्रवेश केला. श्री. सतीश कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील पक्षाची ताकद वाढली आहे.
​या वेळी सतीश कदम यांच्यासोबत श्री. सुनंद सिताराम कदम, अमोल कदम, श्री. राजेंद्र कदम आणि श्री. संजय जाधव यांच्यासह आडवली गावातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.
​पक्षाच्या या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदेश चिटणीस श्री. सुरेश गवस यांनी पक्षसंघटनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. “स्थानिक पातळीवरील पक्षकार्यकर्त्यांना नव्याने उभारी देण्यासाठी आणि पक्षकार्य गतीने पुढे नेण्यासाठी राज्यातील पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे,” अशी आग्रही मागणी गवस यांनी या वेळी केली.
​या कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करून पक्षवाढीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
​या प्रसंगी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, दोडामार्ग तालुकाध्यक्ष श्री. मघेंद्र देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष श्री. रामभाऊ सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री. संदीप पेडणेकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. एम. डी. सावंत सर, श्री. संदीप राणे, श्री. शिरोडकर साहेब, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष श्री. विजय कदम, श्री. गुरुदत्त कामत, सत्यजीत देशमुख, ॲड. चेंदवणकर, श्री. लक्ष्मण गवस, श्री. धर्मजी गावडे, श्री. प्रभाकर गावकर, श्री. सतीश नाईक, रिध्दी परब, श्री. रोहन परब, नितेश पाटील, शशिकांत तळावणेकर, विलास पावसकर, ऑगस्टीन फर्नांडिस, प्रकाश गावडे आणि डॉ. तुषार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा