सावंतवाडी ,दि.०६ जुन
5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जि प शाळा कुणकेरी नं.3 च्या “ताराराणी बुलबुल पथकाने” वृक्षारोपण करत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. ग्रामपंचायत कार्यालय कुणकेरी येथे सरपंच श्रीम सोनिया सावंत तसेच उपसरपंच श्री सुनिल परब यांजकडे पर्यावरणरक्षक तसेच बहुगुणकारी तुळशीच्या रोपट्याच्या कुंड्या सुपूर्त करत शाळा कुणकेरी नं. 3 च्या बुलबुल पथकाने अनोख्या पद्धतीने पर्यावरण दिन साजरा केला.
तसेच ग्रामपंचायतीच्या आवारात वृक्षारोपणही केले. यावेळी ग्रामपंचायत मार्फत शाळेला वृक्षारोपणासाठी “कल्पवृक्ष” देण्यात आले.या उपक्रमात कुणकेरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या डॉ. श्रद्धा कासार, शिक्षक . श्री .नागेश गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री.आत्मेश सावंत,ग्रामसेविका श्रीम. लीना प्रभू, अंगणवाडी ताई श्रीम.गीता परब , श्रीम.रश्मी गावडे, श्रीम.मंगलआशा सावंत, श्रीम गोवेकर तसेच आशा सेविका श्रीम रूची गावडे, श्रीम दिक्षा मेस्री, CRP श्रीम वेदिया सावंत,पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेच्या बुलबुल पथकासह शाळेचे कब पथकही या उपक्रमात सहभागी झाले. शाळेच्या फ्लॉक लिडर श्रीम निता नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी तसेच पालक यांच्या उत्तम सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला . यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मिंगेल मान्येकर यांचेही सहकार्य लाभले. शाळेच्या ताराराणी बुलबुल पथकामार्फत सातत्याने वैशिष्टयपूर्ण उपक्रम राबविले जातात.