सावंतवाडी,दि.१२ सप्टेंबर
इन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी भेटवस्तू वाटप करण्यात आलीयावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवाजी पालव म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये दुग्ध संस्थेने मिळवलेले यशस्वी वासिया साठी अभिमानास्पद आहेदुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी या व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधावी असे पालव यांनी आवाहन केले .
यावेळी इन्सुल्ला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संस्थेची प्रवर्तक सदस्य विनोद गावकर यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हा बँके ला धन्यवाद दिले .दुग्ध उत्पादक शेतकरी यांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास व प्रेम यामुळेच ही प्रगती होत आहे शेतकरी हा मूळ घटक म्हणून गेली बारा वर्ष दुग्ध संस्थेमार्फत हे कार्य केलं जातं त्याचबरोबर विविध उपक्रम राबवले जातातदुग्ध उत्पादनात प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव केला जातो शेतकऱ्यांनी जिल्हा बँक जिल्हा परिषद गोकुळ संघ यांच्या सहकार्यातून शासनाच्या दुग्ध उत्पादन वाढीसाठी तसेच दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घेवून शेतीपूरक शास्वद व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पहावे व आपले दरडोई उत्पन्न वाढवण्याचे आवाहन पेडणेकर यांनी केली
यावेळी कार्यक्रमाला संस्था सचिव संजय सावंत उपाध्यक्ष सहदेव सावंत सदस्य सखाराम बागवे सौ गीतांजली हळदणकर तसेच दुग्ध उत्पादक शेतकरी यशवंत शेटकर वासुदेव हळदणकर आबा देसाई विजय सावंत जयराम पालव बाळू नाईक रुपेश परब आनंद शेट्टी गुरुनाथ हळदणकर नागेश सावंत संतोष परब लिपिकअशोक पडवळ प्रगती गावडेआदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ पेडणेकर आभार सचिव संजय सावंत यांनी मानले